Sunday, January 16, 2011

राग

कधी तरी मी असाच रागावतो कुणावर ही

आणि मग विचार करतो

की मी का रागावलो

नंतर मला कळते की मी स्वत वरच रागावलो आहे

पण ते कळे पर्यंत उशीर झालेला असतो

कुणाला तरी काही तरी बोललो असतो

कुठे तरी काही तरी बिनसले असते

राग येतो मला माझा आणि बहुतेक तुझा ही

नाही फक्त माझाच येतो

आणि मग मी विसरायचा प्रयत्न करतो

सगळेच जे आपल्यात घडले आहे ते

आणि जे घडायचे राहून गेले ते पण

पण ते विसरता येत नाही

का ते माहित नाही

आणि मग अजून राग येतो तुझा

पण रागावतो मी माझ्यावरच

कारण तुझ्यावर अजूनही रागावता येतच नाही मला

1 comment: